कोल्हापूर : भारत गौरव पुरस्कार समिती नवी दिल्ली आणि काली रमण फाउंडेशन इंडिया तसेच दिल्ली पॅरामेडिकल बोर्ड (Gov Of delhi ) यांच्यावतीने भारतीय हरितक्रांतीचे जनक सर छोटूराम स्मृती भारत गौरव पुरस्कार कोल्हापूर येथील स्केटिंग आणि बँडी (आईस स्केटिंग) खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू, बँडी (आईस स्केटिंग) आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड तसेच स्केटिंग या खेळाचे अनेक जागतिक विक्रम स्वतःच्या नावाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद असलेल्या जागतिक विक्रमवीर खेळाडू आणि आदर्श स्केटिंग कोच कुमारी विजया विठ्ठल पाटील यांना दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. कु विजया पाटील यांची स्केटिंग अकॅडमी आहे.
सर छोटूराम यांच्या स्मृतीनिमित्त भारतातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या हस्तींना भारत गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येते. भारत गौरव पुरस्काराचे हे दहावे वर्ष आहे. भारतातील आजपर्यंतचे ऑलिंपिक वीर खेळाडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू, आशियाई पदक विजेते खेळाडू, अर्जुन अवॉर्ड पुरस्कार विजेते, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते. एव्हरेस्ट वीर, ग्रेट सोशल वर्कर, मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर अशा 31 खेळाडूंना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
हा भारत गौरव पुरस्कार केंद्रीय कृषिमंत्र भगीरथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि दिल्ली सरकारचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांचे हस्ते ITC सेंटर लोधी रोड नवी दिल्ली या ठिकाणी संपन्न झाला. भारत गौरव समितीचे चेअरमन सुप्रीम कोर्टाचे नामांकित वकील ॲडव्होकेट सुरेंद्र कालीरमण आणि भारत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्याचे कॉर्डिनेटर प्रा पै. अमोल साठे यांचे मार्गदर्शन लाभले.
या पुरस्काराचे नामांकन आणि शिफारस सुहास कारेकर यांनी ॲडव्होकेट सुरेंद्र काली रमन यांच्याकडे केली होती
विजया पाटील क्रीडा क्षेत्रात अनेक वर्ष कार्यरत असून स्केटिंगमध्ये कोच म्हणून अतिशय चांगली कामगिरी केली आहे, त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना भारत गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी ऑलम्पिक वीर पैलवान सुशील कुमार, ऑलम्पिक वीर नेमबाज मनू भाकर, आशियाई विजेता पैलवान सुनील कुमार, ऑलिंपिक वीर पै रवी दहिया , जागतिक विजेती पै दिव्या काकरण, साक्षी मलिक यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.