विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका : राजेंद्र पाटील- यड्रावकर

जयसिंगपूर : विरोधक सोशल मीडियावरून जाणून बुजून चुकीचा आणि खोटा प्रचार करत आहेत, मतदानाच्या दिवसापर्यंत असा खोटा आणि दिशाभूल करणारा प्रचार विरोधकांकडून जाणीवपूर्वक केला जाईल त्यांच्या या खोट्या प्रचाराला आपण थारा देऊ नका, मी पहिल्यापासून तुमच्यासोबत आहे आणि हयातभर राहीन, असे आश्वासन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले.

 

 

राज्य शासनाच्या माध्यमातून तालुक्याच्या अकिवाट टाकळीवाडी परिसरामध्ये मंजूर झालेल्या शासकीय औद्योगिक वसाहतीच्या गायरान जमिनीवर अनेक वर्ष राहत असलेल्या नागरिकांच्या कोणत्याही घराची वीट मी जिवंत असेपर्यंत हलणार नाही सामान्य माणसांची घरे आहे त्या परिस्थितीत कायम ठेवून या ठिकाणी औद्योगिक वसाहती मधील उद्योगांना जागा दिली जाईल, येणाऱ्या वर्षभराच्या कार्यकाळात अकीवाट टाकळीवाडीसह तालुक्याच्या गायरान क्षेत्रात असलेली सर्व अतिक्रमणे नियमित करून या अतिक्रमणधारकांना त्यांच्या हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मिळवून देईन आणि याच परिसरात बेरोजगार तरुणांच्या बरोबरच परिसरातील पाच हजार महिला भगिनींना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. या औद्योगिक वसाहतीच्या जागेत अनेक वर्ष राहत असलेल्या नागरिकांच्या महिला शिष्टमंडळाला दिली. विरोधक सोशल मीडिया वरून जाणून बुजून चुकीचा आणि खोटा प्रचार करत आहेत, मतदानाच्या दिवसापर्यंत असा खोटा आणि दिशाभूल करणारा प्रचार विरोधकांकडून जाणीवपूर्वक केला जाईल त्यांच्या या खोट्या प्रचाराला आपण थारा देऊ नका मी पहिल्यापासून तुमच्यासोबत आहे आणि हयातभर राहीन असेही त्यांनी या महिला भगिनींशी बोलताना सांगितले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सतीश मलमे यांच्यासह माधुरी टाकारे, महिला उपप्रमुख शिरोळ तालुका प्रमुख उदय झुटाळ, महिला तालुका उपप्रमुख आरती गायकवाड, शिल्पा मिठारे, माधुरी पोतदार, अक्काताई नरूटे, सुनिता मिठारे, लैलाबी मकानदार, अक्काताई बिरणगे, हसीना दाढीवाले, मुमताज मुल्लानी, शोभा कांबळे, सुलोचना रजपूत, शहीना बहिरूपी, शबाना मुजावर यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.