पेठवडगावच्या सर्वागिण विकासात  बळवंतराव यादव यांचे महत्त्वपूर्ण योगदान : आ. राजूबाबा आवळे

पेठवडगाव : पेठवडगाव शहराच्या सर्वागिण विकासात व जडणघडणीत बळवंतराव यादव यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांनी भूदान चळवळीत सहभाग घेतला होता. तसेच वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करून शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्नास दर मिळवून दिला होता, असे प्रतिपादन आमदार राजूबाबा आवळे यांनी केले.

 

माजी नगराध्यक्ष स्व.बळवंतराव यादव यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार राजूबाबा आवळे, माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, माजी नगराध्यक्ष विद्याताई पोळ यांनी त्यांना अभिवादन केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, अभिजित गायकवाड, जयभवानी पतसंस्थेचे चेअरमन विलास सणगर, संदीप पाटील, अमोल हुक्केरी, अभिजीत पोळ, राजकुमार पोळ, राजेंद्र देवस्थळी, जवाहर सलगर,आप्पासो पाटील, रमेश पाटील, रमेश दाभाडे, सुभाष पाटील, सूरज पाटील, शितल कोळी, प्रवीण पाटील,विशाल वडगांवे, सचिन पाटील, हरिहर पोळ, दिपक पाटील,नारायण कोळेकर आदीसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706