विकासासाठी एकत्र आलेच पाहिजे : समरजीत घाटगे

कागल : व्हन्नाळी गावात आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत आपल्या सर्व सहकाऱ्यांनी कागल, गडहिंग्लज आणि उत्तूरच्या सर्वांगीण विकासासाठी सारे मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे आणि लढले पाहिजे, असे आवाहन समरजीत घाटगे यांनी नागरिकांना केले.

 

यावेळी मा. आ. संजय बाबा घाटगे किंवा गोकुळ संचालक अंबरीश घाटगे यांच्याशी माझे काहीही मनभेद नसून वैरही नाही, असे प्रतिपादन करत, आपली लढाई वैचारिक आहे, असे समरजीत घाटगे यांनी सांगितले. यावेळी नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपण ही परिवर्तनाची लढाई जिंकणारच, असा निर्धार केला.

 

🤙 9921334545