…त्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकीत माझा विजय निश्चित : पालकमंत्री हसन मुश्रीफ

उत्तूर : गेल्या २५-३० वर्षातील माझे काम पाहून लोक कार्यक्रमाला आल्यानंतर उत्स्फूर्तपणे भाषण करतात. हेच माझ्यासाठी महत्त्वाचे असून आपण केलेल्या कामाची ही पोहोचपावती आहे. यामध्ये भगिनींही मागे नाहीत. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत माझ्या विजयाची खात्री निश्चित झाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, आपल्याला ज्या – ज्या मंत्रीपदाची संधी मिळाली, त्या संधीचं आपण सोनं केलं आहे. कित्येक कोटी रुपयांचा निधी या मतदार संघाच्या विकासासाठी आणला आहे. त्याची पुस्तिका लवकरच आपल्या सर्वांच्या हातात पडेल, त्यावेळी किती निधी आणला आहे, हे लक्षात येईल.’
उतूर विभागातील भादवानवाडी, खोराटवाडी, जाधेवाडी, मासेवाडी व हालेवाडी या गावांचा संपर्क दौरा केला. त्याप्रसंगी मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. आज सकाळी जोमकाईदेवीचे दर्शन घेऊन मंत्री हसन मुश्रीफ यांनी दौऱ्याला सुरुवात केली. भादवानवाडी ता. आजरा येथे बैठक झाली. स्वागत व प्रास्ताविक अंबाजी कांबळे यांनी केले. यावेळी काशिनाथ तेली यांनी मनोगत व्यक्त केले.
आजरा साखर कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, दीपक देसाई, शिरीष देसाई, सरपंच महादेव दिवेकर, उपसरपंच कृष्णा परीट, सुरेश पाटील, गोविंद मोहिते, विजय चिमणे आदी उपस्थित होते.
जाधेवाडी येथे मधुकर भुजंग, वसंतराव धुरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गणपती सावंत, बापू भुजंग, बाजीराव सावंत, पांडुरंग रावण, प्रभाकर सावंत, शिवाजी सावंत, विश्वास बरडे आदी उपस्थित होते.
दरम्यान मासेवाडी येथे बैठक झाली यावेळी सरपंच स्वाती आजगेकर, उपसरपंच संजीवनी येजरे, गुंडोपंत खोराटे मारुती खोराटे, वसंतराव खोराटे, जयवंतराव खोराटे,
अजित खोराटे, आनंदराव खोराटे, जयवंत खोराटे,
दत्तात्रय खोराटे, तानाजी देसाई, हिंदुराव सावंत आदी उपस्थित होते.

हालेवाडी येथे झालेल्या बैठकीस सरपंच बनाबाई शिंदे, माजी सरपंच अनिल बैलकर, बाळासाहेब पाटील, नंदू पाटील, वाकोजी पाटील, शामराव पाटील, रामचंद्र येजरे, दयानंद आजकेकर, शंकर पाटील आदी उपस्थित होते.