धावपळीतही मंत्री मुश्रीफ यांनी घेतली शेतकरी महिलां भगिनींची भेट

उतूर : विधानसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली.अवघ्या महिन्यावर मतदान येऊन ठेपले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची धावपळ होऊ लागली आहे. अशा धावपळीत रस्त्यावर भाताची मळणी करणाऱ्या महिला भगिनींची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी थांबून भेट घेतली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर जमा झाले की नाही? याची विचारपूस केली.

 

 

एका बाजूला निवडणुकीची धावपळ सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला गेल्या पंधरा दिवसापासून मेघराजा एकसारखा बरसत आहे. त्यामुळे बळीराजाही हैराण झाला आहे. पावसाने थोडी जरी उसंत दिली, तर लगेच शेतकरी तेवढ्याच वेळेत धावपळीत भाताची मळणी काढून घेताना दिसत आहे. असाच प्रसंग असताना आजरा तालुक्यातील मासेवाडी गावाजवळ धावपळीत भाताची मळणी करणाऱ्या महिला भगिनींची हसन मुश्रीफ यांनी विचारपूस केली.