शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये सहकारी संस्थांचे स्थान नेहमीच महत्त्वाचे असते : राजेंद्र पाटील यड्रावकर

कोल्हापूर : जयसिंगपूर येथे श्री अरिहंत को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. बोरगाव (मल्टीस्टेट) जयसिंगपूर या महाराष्ट्र राज्यातल्या पहिल्या शाखेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त महालक्ष्मी व सरस्वती पुजा, उत्तम पाटील व राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.यावेळी राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये सहकारी संस्थांचे स्थान नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. या अर्थवाहिन्या सक्षमपणे चालतात म्हणून शहरी व ग्रामीण भाग समृद्ध होत आहे. श्री अरिहंत को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बोरगाव मल्टीस्टेट संस्थेने निकोप सहकार जपत सर्वसामान्यांची हित लक्षात घेऊन दैदिप्यमान वाटचाल केली आहे.

 

 

या प्रथम वर्धापन दिनास सीईओ अशोक बंकापुरे,प्रकाश पाटील टाकवडेकर,जयसिंगपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष प्रकाश झेले,माजी नगराध्यक्ष राजेंद्र नांद्रेकर,माजी नगराध्यक्ष सुनील पाटील मजलेकर,माजी नगरसेवक राजू झेले,वर्धमान पाटील,अरिहंत शुगर्स लिमिटेडचे एमडी शेट्टी साहेब,दादासो पाटील चिंचवाडकर,शरद मगदूम, महावीर पाटील (MA),राजू खवाटे,राहुल पाटील मोटके उपस्थित होते.