समर्पित भावनेने केलेल्या कामामुळे विजय निश्चित : हसन मुश्रीफ

गडहिंग्लज : अत्याळ, बेळगुंदी, इंचनाळ व ऐनापुर येथे हसन मुश्रीफ यांच्या संपर्क बैठका झाल्या . यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले ,”गेल्या ३० ते ३५ वर्षांच्या सामाजिक व राजकीय जीवनामध्ये आपण नेहमी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून समर्पित भावनेने काम केले आहे. त्यामुळे सर्वांच्या पाठबळावर येत्या विधानसभा निवडणुकीत सहाव्यांदा माझा विजय निश्चित आहे.”

 

 

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील – गिजवणेकर म्हणाले, या मतदारसंघात स्व. बाबासाहेब कुपेकर यांनी विकासाचा पाया घातला होता. त्यावर कळस चढवण्याचे काम मंत्री हसन मुश्रीफ यांनी अविरतपणे केले आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये त्यांनी विकास कामांसाठी प्रचंड निधी उपलब्ध करून या परिसराचा कायापालट केला आहे.

दरम्यान; अत्याळ येथे ज्येष्ठ नेते एस. आर. पाटील, माजी सरपंच शालन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी स्वागत व प्रास्ताविक पृथ्वीराज पाटील यांनी केले. यावेळी जयसिंग पाटील, शामराव गाडीवड्ड, दीपक घोरपडे, आप्पासाहेब पाटील, विजय मोहिते, शाहीर बाटे, पी. के. पाटील, भिकाजी मगदूम, रामकृष्ण पाटील, जयवंत जाधव, महादेव गोडसे यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेळगुंदी येथे सरपंच शामला प्रभाकर सोनवक्के, मिलिंद मगदूम, तानाजी लांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंचनाळ येथील बैठकीत सयाजी देसाई, शिवाजी राणे, आनंदराव पवार, विशाल देसाई, सचिन पाटील, शहाजी वडगे, दत्ताजीराव देसाई, भारत होडगे, महादेव जाधव, उदय पाटील, अमृत शिंत्रे, सुरेश देसाई, मानसिंग पाटील आधी प्रमुख व ग्रामस्थ उपस्थित होते.

ऐनापुर येथे सरपंच उषाताई मांगले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी टि. एस. देसाई, अॅड. पालकर, अर्जुन कुराडे, बाबुराव पाटील, नारायण शेटके, दयानंद देसाई, संतोष देसाई, दत्ता देसाई, संभाजी देसाई, नारायण रोकडे, सदाशिव घुगरे, बाळकृष्ण पाटील, पांडुरंग चौगुले, विलास सूर्यवंशी, पिंटू मांगले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.