जयंत पाटील यांची प्रकाश आवाडेंवर टीका

कुंभोज (विनोद शिंगे)

इचलकरंजी मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने सुरू असलेल्या शिवस्वराज्य यात्रेची जाहीर सभा संपन्न झाली . यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद कांबळे, ग्रामपंचायत सदस्य यासह अन्य पदाधिकारी यांनी पक्ष प्रवेश केला. कार्यक्रमात सुनील गव्हाण, आर के पवार, पंडित कांबळे व मेहबूब शेख यांनीही मनोगत व्यक्त केली.

 

 

जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट मध्ये आपण निवडून येणार नाही. त्यामुळे अनेक योजना लोकांना लाच म्हणून देण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये सुरू झाला आहे. सुप्रीम कोर्टाने अशा योजना देणे म्हणजे लाच देणे आहे, अशा भाषेत कोर्टाने सरकारला फटकारले असल्याचेही पाटील यांनी यावेळी नमूद केले. शहरातील जे प्रश्न आहेत ते पुढे नेण्यासाठी, इचलकरंजीकरांना 24 तास पाणी उपलब्ध करून देण्यासाठी यासह अन्य काही प्रश्न महत्त्वाचे आहेत ते सोडवण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष पुढाकार घेईल, असे आश्वासन ही पाटील यांनी यावेळी दिले.

ज्यांनी गद्दारी केली, ज्यांनी महाराष्ट्रातील पक्ष फोडले, महिलांची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था बिघडली त्यांनी सत्तेची दिवाळी बघण्यासाठी राज्याची तिजोरीची होळी केली.त्यांचा कार्यक्रम ठरलाय असे आवाहन खासदार अमोल काल्हे यांनी केले. सरकारने शेकडो घोषणा केल्या आहेत. शेकडो निर्णय घेतले यावरून समजून येते की अडीच वर्ष या सरकारने काहीच केले नाही. जो गुजरातसाठी राबला तो लोकसभेला पडला. . लोकसभेला चूक झाली परंतु विधानसभेला नको त्यासाठी मशालीच्या उजेडात बळकट हातात तुतारी वाजवा, असे आवाहन ही कोल्हे यांनी केले.

कार्यक्रमात प्रास्ताविक सुहास जांभळे तर आभार मदन कारंडे यांनी मानले. कार्यक्रमात माजी आमदार राजीव आवळे , अशोक जांभळे, व्ही बी पाटील, उदयसिंग पाटील, अब्राहम आवळे, यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते