कोल्हापूर : पट्टणकोडोली येथे ५२.५० लाख रूपयांच्या नव्या विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. पट्टणकोडोली येथील पायाभूत सुविधा बळकट करण्यास पाच वर्षात कोट्यवधीचा निधी खर्च झाला आहे.
यावेळी राजूबाबा आवळे यांनी भविष्यात अजून विकासकामाच्या माध्यमातून पट्टणकोडोली गावाला प्रगतीपथावर नेण्याचा माझा संकल्प आहे. त्यासाठी तुमची साथ मला राहिल असा विश्वास यावेळी व्यक्त केला. तसेच त्यांनी गावातील प्रश्नांबाबत नागरिक, महिला भगिंनीशी संवाद साधत मनमोकळ्या गप्पा मारल्या.
यावेळी ग्रामस्थ, तरूण मित्र आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.