मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आज मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक तपासणीत त्यांच्या हृदयात ब्लॉकेजेस आढळल्यामुळं त्यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती सूत्रांंनी दिली आहे.
उद्धव ठाकरे हे आरोग्य तपासणीसाठी एच.एन रिलायन्स रुग्णालयात गेले, ठाकरेंच्या हृदयाच्या धमन्यांमधील ब्लॉकेज तपासण्यासाठी चाचण्या केल्या. या रिपोर्टमध्ये ब्लॉकेज आढळल्याने उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. सकाळी ८ वाजता उद्धव ठाकरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. याआधी २०१२ साली ठाकरेंवर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
राज्यात २०२२ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा तीव्र राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला धूळ चारल्यानंतर महाविकास आघाडीचा उत्साह दुणावला आहे. राज्यात महाविकास आघाडीची धुरा प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हाती आहे.