संताजी घोरपडे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ

 

प्रतिनिधी – सुदर्शन पाटील

व्हिजन चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताची बाबा घोरपडे यांनी कोणतेही पद नसताना करवीर विधानसभा मतदारसंघातील खडूळे तांदुळवाडी कोलीक बोरबेट या ठिकाणी विकास निधी आणला आहे या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला

 

 

व्हिजन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून पंचक्रोशीतील रुग्णांवर ती त्यांनी मोफत उपचार करण्याची सोय केली आहे त्याचबरोबर वृक्ष लागवडीतून पर्यावरण संवर्धनासोबतच विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवित करवीर विधानसभा मतदारसंघातील काही गावात त्यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी रस्ते विकास शाळा दुरुस्ती अंगणवाडी दुरुस्ती इत्यादी कामांसाठी आणला आहे रस्ते विकास निधी अंतर्गत आज पर्यंत सावर्डे (जाधववाडी) लोंघे कळे अंबर्डे पुशिरे महाडिक वाडी वारनुळ हनुमंतवाडी खोकुर्ले कोपार्डे कसबा बीड म्हाळुंगे कुडित्रे बोरबेट पडळ खडूळे कोलिक तांदुळवाडी माजगाव या गावात निधी विकास निधी आणलेला आहे यापैकी खडूळे तांदुळवाडी कोलिक बोरबेट या गावातील विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला

कोणतेही राजकीय पद नसताना केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे जनसुराज्य प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या पाठबळामुळेच मी हा निधी आणू शकलो असे प्रतिपादन संताजी घोरपडे यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच गावोगावी रस्ते विकास कामांसाठी दिला जाणारा निधी हा जनतेचाच पैसा आहे आपण उत्पादनावर जो कर भरतो तोच पैसा निधीच्या माध्यमातून आपल्याला परत दिला जातो. लोकप्रतिनिधी हे केवळ माध्यम आहे परंतु निधीचा पैसा हा जनतेचाच आहे असे नम्र मत यावेळी संताजी बाबा घोरपडे यांनी व्यक्त केले . कोणतेही राजकीय पद नसताना गावांसाठी विकास निधी दिल्याबद्दल संताजी बाबा घोरपडे यांचे परिसरातील नागरिकांनी आभार मानले