कोल्हापूर: शिराळे/वारुण ते शित्तुर/वारुण रस्ता करणे – २ कोटी २० लाख,शिराळे/वारुण पैकी पार्टेवाडी पुल बांधणे -६० लाख,शिराळे/वारुण पैकी पार्टेवाडी रस्ता करणे – ३० लाख,शिराळे/वारुण पैकी सोंदूलकरवाडी रस्ता डांबरी करण ५० लाख अशा विविध विकासकामांसाठी ३ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.या कामांचे भूमिपूजन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) व ग्रामस्थांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर),कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाबा लाड,युवराज बाबा काटकर,शाहूवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती बबनराव पाटील(आप्पा),माजी सरपंच संजय सोंडूलकर,माजी सरपंच राजाराम चाळके,माजी ग्रामपंचायत सदस्य भगवान मालुसरे यांच्यासह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी,ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
