कोल्हापूर : गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रीक, रेडिमेंट आदि जीवनाआवश्यक सर्वच वस्तुंची होलसेल व रिटेल बाजार पेठ आहे. सद्या दसरा व दिवाळी सणाच्या निमित्याने होलसेल खरेदीदारांची तसेच रिटेल खरेदीदारांची वर्दळ सुरू असून बाजार पेठ ही दिवाळी, दसऱ्याच्या वस्तुने सजली आहे. बाजार पेठेत हळू हळू गर्दी होणेस सुरूवात झाली असून मुळात ऑक्टोंबर हिट जोरात असताना सोमवारी तब्बल १२ तास विज खंडीत करून व्यापाऱ्यांची व खरेदीला येणाऱ्यांची मोठी कुचुंबना विज वितरणने केली होती.
संपूर्ण बाजारपेठेतील संगणकप्रणाली बंद होती तसेच संपूर्ण बाजार पेठेत अंधाऱ्याचे साम्राज होते. सद्या सणासुदीचे दिवस असल्याने अशा प्रकारे विज खंडीत करून व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान केले आहे. मुळात गांधीनगर मध्ये दाटीवाटीची लोकवस्ती असल्याने येथे फॅन किंवा ए.सी. शिवाय काही चालु शकत नाही अशी परिस्थिती गांधीनगरची आहे. विज वितरण कंपनीने कामे करायची असतील तर ती पुर्वी करणे गरजेचे होते. या नंतर बाजार पेठे मध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते, त्यावेळी ही विज खंडीत होण्याचे प्रकार घडत असतात. बाजारपेठे मध्ये विजेची मोठी मागणी असल्याने त्याचा आकार ही मोठा असल्याने विज वितरणाला उत्पन्न स्वरूपात मोठी रक्कम मिळते. मग विज वितरण असे भारनियम करून व्यापाऱ्यांना जाणुन बजुन त्रास देते का ? येणारा अधिकारी म्हणतो पुर्वीच्या अधिकाऱ्यांनी ठोस असे काम न केल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. असे म्हणणे येणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याचे आहे.
येथुन पुढे कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारे विज खंडीत झाली तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडून घालण्याचे आंदोलन करण्यात येईल असे करवीर तालुका म्हणाले, व अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबती करत धारेवर धरत ईथून पुढे आंदोलनाच्या होणाऱ्या परिणामास विज वितरण जबाबदार असेल. असे ठणकावून सांगितले. अधिकारी यांनी इथून पुढे सणासुदीला वीज खंडित न करण्याचे आश्वासन देत विज गेली तर तात्काळ दुरुस्ती करू असे अधिकारी सहाय्यक अभियंता विजय कोठावळे म्हणाले. यावेळी उपस्थित करवीर तालुकाप्रमुख राजू यादव.दिलीप सावंत, दिपक पोपटाणी, दिपक अंकल, दिपक धिंग, शरद माळी, बाळासाहेब नलवडे, विरेंद्र भोपळे, किशोर कामरा, सुनिल पारपाणी, वसंत पोवार, आबा जाधव, नमेश चव्हाण, मोहन राजपूत, श्रीकांत सावंत,बाबुराव पाटील, धर्मेंद्र मेघवानी शिवसैनिक, तसेच व्यापारी; दिलीप कुकरेजा, रमेश वाच्छानी, सुरेश रंगलानी, संतोष निरंकारी, सोनू जयसिंगानी आदी व्यापारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.