संधी मिळाल्याने मोठे काम करता आले : हसन मुश्रीफ

कोल्हापूर: बेनीक्रे ता. कागल येथे ११ कोटी ३५ लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे होते.

हसन मुश्रीफ म्हणाले, विकास कामाबरोबरच सर्वसामान्यांच्या आपल्याकडून असंख्य अपेक्षा आहेत. त्याचा आपण बारकाईने अभ्यास करून सर्वांना समान न्याय कसा देता येईल? याचाच विचार केला. म्हणूनच संजय गांधी, श्रावण बाळ योजनेसह बांधकाम कामगार महामंडळामार्फत विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात यशस्वी झालो आहे.’

माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, ‘मंत्री हसन मुश्रीफ यांची सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेली आहे. सामान्यातील सामान्य माणसाला त्यांनी आजवर न्याय देण्याचेच काम केले आहे. उपेक्षितांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणारे हे बलदंड नेतृत्व महाराष्ट्राच्या समाजकारण आणि राजकारणात कायम उभे राहिले पाहिजे, म्हणूनच आमचा सर्व गट त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे.

बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक कारखान्याचे माजी संचालक आर. डी. पाटील- कुरुकलीकर म्हणाले, ‘मंत्री हसन मुश्रीफ यांचे कामच इतके मोठे आहे की त्यांना मते द्या, म्हणूनच मते द्या म्हणून सांगायची गरज नाही. त्यांच्यासारखे नेतृत्व या महाराष्ट्रातही सापडणार नाही. त्यांनी त्यांचं काम केले आहे. आता आपण त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची वेळ आली आहे. असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा शितल फराकटे, माजी सरपंच विलास काळुगडे यांनी मनोगत व्यक्त केले.

स्वागत वसंतराव जाधव यांनी केले. प्रास्ताविक राजू जाधव यांनी केले. यावेळी बिद्री साखर कारखान्याचे संचालक आर. व्ही. पाटील, उपमहाराष्ट्र केसरी पै. रवींद्र पाटील, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष विकास पाटील, एड. जीवन शिंदे, उपसरपंच सूर्याजी जाधव, मयूर आवळेकर, निलेश शिंदे,सचिन वाडकर, छाया कळके, अमिता पालकर, बाजीराव कांबळे आदी उपस्थित होते.