शाहूवाडी : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील कडवी खोऱ्यातील डोंगरकपारीत वसलेलं करूंगळे गाव तेथील एक ध्येय वेडा तरुण राजाराम वारंग १९९६ साली भारतीय सैन्य दलात शिपाई पदावर भरती होऊन शिपाई, लान्सनाईक, नायक ,हवलदार, नायब सुभेदार, सुभेदार, सुभेदार मेजर, लेफ्टनंट, कॅप्टन पदापर्यंत पोहोचलेला हा यशस्वी तरुण कॅप्टन राजाराम ठानु वारंग. गाव तालुका जिल्ह्याचे नाव भारतीय लष्करात कोरल त्याची ही प्रेरणादायी यशोगाथा.
ग्रामदैवत निनाई विठ्ठलाईच्या आशीर्वादाने गुण्या गोविंदांन नांदत असलेलं हे करुंगळे गाव आणि तेथील एक जिगरबाज तरुण कॅप्टन राजाराम ठाणू वारंग एस वाय बी ए च्या वर्गात शिकत असताना मित्रांच्या संगतीने आदल्या दिवशी ठरतं जाऊया का उद्या भरतीलाआणि सैन्य भरतीसाठी जातो, आणि तितकच नव्हे तर त्याची निवड ही होते . सैन्यात जाणे विषयीची आई वडिलांचे मनातील भीती दूर करुन सर्वांचीच मन धरणी करून वडील ठाणू निनू वारंग व आई अनुबाई त्यांचे जेष्ठ बंधू बळीराम वारंग यांचा आशीर्वाद घेऊन हा तरुण बेळगाव येथे ट्रेनिंग साठी गेला. देशसेवेची आवड मनात रुजल्यानंतर मात्र प्रवास सुरू झाला तो म्हणजे सेवेचा. सर्वप्रथम शिपाई पदावर रुजू होऊन भारत मातेची सेवा आणि करिअर या दोन्हीही संधी एकत्र जुळून आल्याने आनंदही तितकाच होता. सुरुवातीला त्रिपुरा,सिक्कीम या ठिकाणी नियुक्ती झाली त्या ठिकाणी असणारी कडाक्याची थंडी, वारा याचा सामना करत सुरुवात केली. १९९९ मध्ये जम्मू-काश्मीर च्या ठिकाणी उत्कृष्टपणे सेवा बजावली. तेथेच सेवेचा संकल्प मात्र दिवसेंदिवस वाढतच राहिला. २००२ जम्मू कालाकोट, दोन वर्षांची सेवा त्या ठिकाणी २००५ मध्ये कमांडो ट्रेनिंग च्या माध्यमातून तीन वर्षे दिल्ली येथे रुजू होऊन त्या ठिकाणी मात्र पत्नी मुले आई आबांच्या समवेत आनंदाचे क्षण कौटुंबिक जिव्हाळा ही निभवता आला.
बर्फाळ प्रदेशात भारत-पाकिस्तान सरहद्दीचे केलेल्या संरक्षण सेवा आणि त्या सेवेपर्यंत अनेकदा बढतीची संधी मिळाली व कौतुकाचा वर्षावही झाला. २०१२ मध्ये महाराष्ट्र एनसीसी ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली त्यांना शिकवण्याची सुद्धा प्रचंड आवड होती . एनसीसीच्या माध्यमातून का होईना मास्तर झाल्याचा आनंद सुद्धा त्यांना झाला होता. २०१४ साली परत जम्मू-काश्मीरला बोलावण आलं. पुंन्च एरियामध्ये बोलावणार म्हटलं की आतंकवाद्यांच ठिकाण अशा ठिकाणी सुद्धा रात्रंदिवस सेवा करत दोन वर्षे उल्लेखनीय कामगिरी केली आणि सुभेदार पदाचा मान मिळाला.
त्यांनी खडतर परिस्थिती सामना केला. वेळोवेळी होणारी फायरिंग, तुकडीचे नेतृत्व करत असताना शहीद झालेले सहकारी मित्र तरीही न डगमगता भारत मातेचे रक्षण कर्तव्यदक्षपणे केले . त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा आलेख नेहमी चढताच राहिला. त्यांच्या जोरावर २०१७ मध्ये भारतीय शांती सेनेमधून साउथ सुदानला त्यांना रवाना केले व त्याही ठिकाणी त्यांचा गौरव व सन्मान होतच होता .
२०१८भारत पाकिस्तानच्या सरहद्दीचे रक्षण करण्याचे भाग्य लाभलं २०१९ लडाख येथे रवाना झाले. आणि द्रास ,कारगिल सारख्या भल्या मोठ्या पहाडीत गस्त घालण्याचे काम केले. २०२० सुभेदार मेजर पदावर बढती झाली. पुन्हा जम्मू-काश्मीर २७ राष्ट्रीय रायफल १ सप्टेंबर रोजी तुकडीचा प्रमुख म्हणून कार्यभार हाती घेतला. त्यावेळेस मात्र भयानक परिस्थिती भारत चीन संबंध बिघडले होते.2 सप्टेंबर, ज्या ठिकाणी ऑक्सिजनचा अभाव असते ते ठिकाण गलवान. त्यातनंतर अर्ध पैगाग तळ तुझ अर्ध तळ माझ हा आंतरराष्ट्रीय वाद अशातच तुकडीला घेऊन या सर हददीचे संरक्षण सुद्धा या व्यक्तीने पार पाडलं. परत २०२२ मध्ये महाराष्ट्र गर्ल बटालियन ला शिकवण्याचे भाग्य लाभल . एनसीसी च्या विद्यार्थ्यांच्या मनात ऊर्जा निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख या काळात महाराष्ट्रातील एनसीसी च्या विद्यार्थ्यांचा प्रेरणास्त्रोतच म्हणून कॅप्टन राजाराम वारंग यांनी विद्यार्थ्यांच्या मनावर सुद्धा अधिराज्य गाजवलं.
परत मुळ तुकडी 14 मराठा मध्ये हेडक्वाटरला गेले. अठ्ठावीस वर्षे प्रदीर्घ सेवेचा तपशील पडताळल्यानंतर भारतीय लष्करातून जी पदे राष्ट्रपतींच्या गॅझेटने मिळतात त्यातील एक २६ जानेवारी २०२४ रोजी लेफ्टनंट ही पदवी प्राप्त झाली आणि त्यानंतर १५ ऑगस्ट २०२४रोजी कॅप्टन पदाचा स्वीकार केल्यानंतर मात्र आलेल्या जन्माचं सार्थक झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आजही दिसून येतोय.
भारत मातेच्या सेवेचे वृत्त जपलेला हा सेवायात्री ०१ आक्टोंबर २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले .