राजूबाबा आवळे यांच्या हस्ते कोल्हापूर ते पट्टणकोडोली रस्त्यावरील अलाटवाडी येथील पुलाचा उदघाटन सोहळा संपन्न

कोल्हापूर : कोल्हापूर ते पट्टणकोडोली रस्त्यावरील अलाटवाडी येथील पुल उभारण्यात यावा, अशी नागरिकांची अनेक दिवसांची मागणी होती. या पुलाची मोठी दुरावस्था झाल्यामुळे परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांना यांचा मोठा फटका बसत होता. या सगळ्या अडचणी आणि समस्या जाणून या पुलाच्या कामासाठी 2 कोटी 76 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. पुलाचे काम पुर्णत्वास जाऊन आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

 

 

या पूलाच्या उभारणीमुळे परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात होणारा त्रास कमी होऊन वाहतूक देखील सुरळीत होणार आहे. भविष्यातही मतदारसंघातील दळणवळण आणि पायाभुत सुविधा बळकट व्हाव्यात यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. असे राजूबाबा आवळे यांनी सांगितले.

या उद्धाटनप्रसंगी सरपंच, उपसरपंच, सदस्य, गावातील नागरिक, महिला आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545