कोल्हापूर: साई उद्योग समूहातील विविध संघांची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी चेतन नरके उपस्थित होते.यावेळी ते म्हणाले, भारत देश जगात दूध व्यवसायामध्ये व गायी व्यवस्थापनात अग्रेसर असून या व्यवसायात आर्थिक विकास साधण्यासाठी मुक्त गोठा पद्धत, जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करत दूध व दुग्धजन्य पदार्थाचा आर्थिक विकासाच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. कारण येत्या काही दिवसात दूध व्यवसायाची वाढ होणार आहे.
तसेच या कार्यक्रमाप्रसंगी विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या व्यक्तींचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. त्याचबरोबर उत्पादकांना बक्षीस वितरण केले.
याप्रसंगी साई सहकार उद्योग समूहाचे प्रबंधक प्रदीप जाधव, यावेळी भैरवनाथ संस्थेचे व्हाईस चेअरमन अण्णासो चौगुले, साईनाथ दूध संघाचे चेअरमन आप्पासो पाटील, अशोक बोतले, जिजामाता महिला संघाच्या अध्यक्षा नम्रता जाधव, उपाध्यक्षा भाग्यश्री माने, शशिकांत बोतले, शब्बीर मुल्ला, भाऊसाहेब चिंदके, सुनील चळणे, ग्रामपंचायत अध्यक्ष राहुल प्रताप, सुनील सप्तसागर, राजू कराडे, भारत करडे, दत्ता पाटील, आशा कोळी यांच्यासह समूहाचे सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.