कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील कावणे (ता. करवीर) येथे २ कोटी १० लाख रुपये खर्चून करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचे उदघाटन ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सांस्कृतिक हॉल बांधणे, गावांतर्गत रस्ते करणे, छोटा पूल बांधकाम करणे व संरक्षक भिंत बांधणे, रस्ता डांबरीकरण, दलितवस्ती समाजमंदिर बांधणे आदी विकासकामांचा समावेश आहे.

यावेळी, बिद्रीचे संचालक एस.बी. पाटील, आर.एस. कांबळे, सुयोग वाडकर, ग्रामपंचायत माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य एस.के. पाटील, विलास सुर्यवंशी, सुजाता पाटील, विकास कांबळे, अजित सुर्यवंशी, भिमराव पाटील, माजी सरपंच बजरंग पाटील, विठ्ठल पाटील, सचिन पाटील, जयवंत घाटगे, विजय पाटील, अमर पाटील, डी. टी. कांबळे, सदाशिव कांबळे, पी. आर. कांबळे, प्रदीप पाटील, अशोक झंजे, दत्तात्रय म्हाळुंगेकर, बाजीराव पाटील, रघुनाथ पाटील, गणेश कांबळे आदी उपस्थित होते
