अश्विन बनला भारताचा ‘आशिया किंग’ बॉलर

मुंबई: टीम इंडियाचा स्टार खेळाडू आर. अश्विन ने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियम वर भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना होत आहे.या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यांने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

यावेळी, या सामन्यात बांगलादेशच्या कर्णधार नजमूल हुसेन शांतोला बाद करताच, अश्विन आशिया खंडात सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला. या विशेष यादीत भारताचा माजी दिग्गज लेगस्पिनर अनिल कुंबळे यांना अश्विन ने मागे टाकले. कुंबळे 419 विकेट्स घेऊन अवल्ल स्थानी होते. मात्र आता अश्विनच्या नावावर आशियामध्ये 420 विकेट जमा होताच ते दुसऱ्या स्थानी आले आहेत.