कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या कला क्षेत्रासह क्रीडा क्षेत्राला वाव दिला. यामध्ये साठमारी परिसराला अनन्य साधारण महत्त्व आहे. या साठमारीच्या संवर्धनासाठी आगामी काळात प्रयत्न करण्यात येणार असून, याठिकाणचा ऐतिहासिक वारसा जगासमोर यावा यासाठी सर्वांना सोबत घेवून काम करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोल्हापूर शहरास कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर होत आहे. शहरातील बरेचशे प्रश्न मार्गी लागले आहेत. आगामी काळातही शहरातील विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षराजेश क्षीरसागर यांनी दिली.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून कोल्हापूर महानगरपालिका प्र.क्र.४४ मंगेशकर नगर अंतर्गत साठमारी परिसरातील भैरवनाथ चौक ते गोखले कॉलेज पर्यंत ड्रेनेज लाईन करणे या विकास कामांचा शुभारंभ आज भागातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. उद्घाटनाच्या सुरवातीस परिसरातील जेष्ठ नागरिकांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे पुष्पगुच्छ देवून आभार मानले.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे लोकाभिमुख व लोककल्याणकारी कामकाज सुरु आहे. आजपर्यंतच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात कोट्यावधींचा निधी कोल्हापूर शहराला प्राप्त झाला आहे. आई अंबाबाई च्या कृपेने आणि राजर्षी शाहू महाराजांच्या आशीर्वादाने कोल्हापूरला ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभला आहे. शाहूकालीन व त्याहीपूर्वीच्या ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. याकडे विशेष लक्ष दिले जाईल. आगामी काळात या परिसरातील रस्ते, मंडळाच्या इमारती आदी प्रश्न मार्गी लावून, परिसराचा कायापालट करून दाखवू, असे राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
यावेळी आनंदराव पायमल ,चंद्रकांत देसाई, राजाराम मेथे,राजाराम चौगुले ,किशोर टिपुगडे ,एकनाथ टिपूगडे विलास मेथै,राजेंद्र पोवार कृष्णत बोडके, दिलीप जाधव ,संजय पायमल , शुभहस्ते संपन्न झाला यावेळी तुकाराम माळी तालीम मंडळाच्या अध्यक्ष शिवाजी पोवार यांच्या हस्ते साहेबांचं फुलगुच्छ देऊन आभार मानण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रणजीत मंडलीक, किरण अतिग्रे, विभाग प्रमुख शेखर चौगुले, उपशहर प्रमुख सचिन पाटील युवा सेना शहर समन्वयक कुणाल शिंदे उपशहर प्रमुख विश्वनाथ माळकर, उपशहर प्रमुख अश्विन शेळके, गणेश रांगणेकर,राहुल चव्हाण, विभाग प्रमुख श्रीकांत मंडलिक, उपशहर प्रमुख क्रांतीकुमार पाटील तसेच तुकाराम माळी तालमीचे ,साठमारी फ्रेंड्स सर्कलचे अमर तरुण मंडळाचे, जय हिंद ग्रुप चे आणि टायगर ग्रुप चे युवा कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत किरण अतिग्रे यांनी केले. सर्वांचे आभारशिवसेना उपजिल्हाप्रमुख रणजीत मंडलिक यांनी केले.