चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली पाडळी बुद्रुक गावातील कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश

कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदार संघातील, पाडळी बुद्रुक गावातील निरनिराळ्या संस्थांचे काँग्रेस गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. “माझं जणसेवेसाठी सदैव तत्पर असणं, मतदार संघातील जनसंपर्क, एकूणच माझ्या कार्यप्रणालीवर प्रेम करणाऱ्या या लोकांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.”असे प्रतिपादन नरके यांनी केले.


यावेळी, धनाजी शंकर पाटील (ग्रा.प. सदस्य) यांच्यासह, गौतम सरनाईक (उपसरपंच), स्वप्निल पाटील, शीतल स्वप्निल पाटील (ग्रा.पं.सदस्य), अमरसिंह आनंदराव पाटील (चेअरमन जयभवानी दुध), जयभवानी दूध संस्थेचे संचालक मंडळ यामध्ये उत्तम पाटील, नारायण पाटील, निलेश पाटील, लता रंगराव ठाणेकर, बाबासाहेब कांबळे, सचिव प्रकाश पाटील त्याचबरोबर शिवशंभो पत संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रकाश विष्णू राऊत, संचालक उत्तम मनोहर पाटील, कृष्णात जाधव (संचालक, शिवशंभो पतसंस्था व लोकसेवा दुध संस्था), महादेव पाटील (संचालक शिवशंभो पतसंस्था) यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमधून माजी आमदार चंद्रदीप नरके गटात प्रवेश केला.

या प्रवेशास महत्वाचे सहकार्य लाभले ते म्हणजे एस.आर. पाटील (गोकुळ संचालक), शिवाजी कुडाळकर, सचिन पाटील सर यांचे! याचबरोबर संजय पाटील, अशोक पाटील, सागर पाटील, सुलतान मुल्लाणी, भरत कळंत्रे, सदाशिव कांबळे, संजय पाटील, प्रविण पाटील, दिपक पाटील (एच.आर.), शरद पाटील, ऋत्विक पाटील, रोहन पाटील, संदीप ठाणेकर, आशिष पाटील, तसेच युवराज देसाई (वाय.डी.), प्रकाश पाटील-डंगरी यांचे देखील सदर पक्षप्रवेशास सहकार्य लाभले.

🤙 9921334545