मुंबई : राज्यात 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रात धो-धो पाऊस कोसळणार आहे. तर राज्यातील नांदेड, लातूर, परभणी, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर , पुणे, बीड या जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार आहे. राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहणार असल्यामुळे या भागातील नागरिकांनी अलर्ट राहावं असं आवाहन हवामानतज्ञ पंजाबराव डख यांनी केलं आहे.
हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये संभाव्य अतिवृष्टीसाठी सतर्कता जाहीर केली आहे. नागरिकांनी आवश्यक सावधानता बाळगावी. सदर परिस्थितीच्या आढावा घेण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि संबंधित स्थानिक प्रशासन सतत स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.