म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासासाठी महत्वपूर्ण निर्णय – 15,000 रहिवाशांना मिळणार नवीन घरे;

मुंबई : मुंबईतील अभ्युदय नगर येथील म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाबाबत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे बैठक घेतली. यावेळी अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.या बैठकीत प्रकल्पातील रहिवाशांच्या मागण्या जाणून घेत.

अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाची निविदा काढताना-सदनिकेचे क्षेत्रफळ 635 चौरस फूटपेक्षा जास्त असावे,भविष्याच्या दृष्टीने सदनिकाधारकाला चारचाकी वाहन पार्किंग असावी,सदनिकेची किंमत खुल्या बाजारभावानुसार असावी.
अशा अटी समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या. या पुनर्विकासामुळे अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीतील 15,000 रहिवाशांना फायदा होणार आहे.

या बैठकीला मंत्री अतुल सावे , आ. प्रवीण दरेकर, आ. प्रसाद लाड, अभ्युदय नगर सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाचे पदाधिकारी तसेच म्हाडाचे अधिकारी उपस्थित होते.