फुले, शाहू ,आंबेडकरांचे विचारच देशाला तारतील – अनिल चव्हाण

कोल्हापूर :देशात अराजक माजले आहे. धर्माधर्मात जाती जातीत संघर्ष होत असून गरीब- श्रीमंत दरी वाढत आहे. अशावेळी महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार देशाला तारतील असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक मंडळ सदस्य अनिल चव्हाण यांनी केले.संकल्प माध्यमिक विद्यालयात ‘मी सावित्री बोलते’ या एकपात्री प्रयोग कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. फुले शाहू आंबेडकरांचे विचार शाळांमध्ये पोचवण्याचा संकल्प महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे, त्याचा एक भाग म्हणून संकल्प विद्यालयात, ‘मी सावित्री बोलते’ या एकपात्री प्रयोगाची कार्यशाळा घेऊन 21 कलाकार मुली तयार करण्यात आल्या.

त्यांचा सत्कार पुस्तके देऊन अनिल चव्हाण आणि आनंदराव चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, आपटे नगर शाखेचे अध्यक्ष आणि माननीय मुख्याध्यापक प्रकाश सुतार अध्यक्षस्थानी होते. पारितोषिक रूपातील पुस्तके प्राचार्य एम डी देशपांडे सर यांच्या पंचविसाव्या स्मृतिदिनानिमित्त प्रभाताई देशपांडे यांनी भेट दिली आहेत. प्रमुख वक्ते आनंदराव चौगुले यांनी आपटे नगर भागात अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम वाढवण्याचे आवाहन केले!प्रास्ताविक कुलकर्णी सर यांनी तर आभार प्रदर्शन अनिता पाटील यांनी केले!
यावेळी अवधूत कुलकर्णी, आर डी पाटील, अनिता पाटील, सुषमा सुतार, प्रशांत चौगुले, संभाजी चौगुले ,दत्ता पाटील, संभाजी पाटील, यशवंत रानगे उपस्थित होते.