कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे
मुख्यमंत्री बहीण लाडकी योजनेच्या माध्यमातून हातकणंगले तालुक्यात 1 लाख 38 हजार 450 महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे प्राप्त झाले असून, उर्वरित पाचशे महिलांचे पैसे देण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कमिटी प्रयत्नशील असून येणाऱ्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक घरात जाऊन सर्वे करून प्रत्येक महिलेला सदर योजनेचा लाभ मिळवून देण्याचे काम कमिटीच्या मार्फत केले जाणार आहे.त्यासाठी महिलांनी सहकार्य करावे, या योजनेतून महिलांना मोठ्या प्रमाणात सहाय्य केले जाईल त्यासाठी ही योजना सतत चालू राहणे गरजेचे आहे व त्यासाठी शिंदे फडवणीस सरकार सत्तेत असणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सहकार्य करावे असे आव्हान हातकलंगले तालुका बहिण लाडकी योजना कमिटीचे अध्यक्ष माजी सभापती अविनाश बनगे यांनी काढले.
ते मौजे वडगाव तालुका हातकलंगले येथे मुख्यमंत्री बहीण लाडकी योजनेअंतर्गत आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. मुख्यमंत्री बहीण लाडके योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात 420 कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून शिंदे सरकार हे सर्वसामान्य महिलांच्या हिताचे सरकार असून त्यासाठी खासदार धैरशील माने यांचे कोल्हापूर जिल्ह्यात सहकार्य लाभले आहे.
परिणामी येणारे काळात शिंदे सरकारच्या माध्यमातून आपण अनेक योजना राबवणार असून त्यासाठी पुन्हा एकदा शिंदे फडवणीस सरकार सत्तेत आना असे आवाहन यावेळी कमिटीचे अध्यक्ष अविनाश बनगे यांनी केले.
सदर योजना पूर्ण करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मोलाचे सहकार्य लाभले व त्यांच्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले तालुका ही योजना राबविण्यात अग्रक्रमी ठरला याबद्दल सेविका व मदतनीस यांचे आभार अविनाश बंनगे यांनी मानले. यावेळी मौजे तासगावचे गटनेते शिवाजी पाटील ,सरपंच चंद्रकांत गुरव, पत्रकार विनोद शिंगे,अतुल कांबळे यांच्या हस्ते अविनाश बनगे यांचा सत्कार करण्यात आला.