नवसाला पावणारा २१ फूटी महागणपती विसर्जनासाठी मार्गस्थ ;

कोल्हापूर प्रतिनिधी : सौरभ पाटील
कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील नवसाला पावणारा २१ फूटी महागणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाला. हाती फुले आणि भरल्या डोळ्यांनी गणपती बाप्पाला निरोप दिला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या गजराने परिसर दुमदुमून गेला.
कोल्हापुरातील सार्वजनिक गणेशोत्सव २०२४ ची मिरवणूक विसर्जन १७ सप्टेंबर रोजी सुरू झाली होती. शहरातील लहान – मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले. कोल्हापूरच्या नवसाला पावणारा २१ फूटी महागणपती विसर्जनासाठी आज दिनांक – १८ सप्टेंबर रोजी मार्गस्थ झाला.

 

अत्यंत भक्तिमय वातावरणात भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रभू श्री राम, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या आकर्षक मूर्ती तसेच ढोल ताशा पथक हे मिरवणूकीचे आकर्षण होते.