धनगर समाजाच्या आरक्षणा बाबत सरकार सकारात्मक – एकनाथ शिंदे ;

कोल्हापूर प्रतिनिधी : सौरभ पाटील
धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी पंढरपूरसह राज्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल धनगर जमात समन्वय समितीच्या शिष्टमंडळासोबत मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृहात बैठक पार पडली.

 

धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील. हा समावेश कायद्याच्या चौकटीत टिकणारा आणि अन्य कुठल्याही समाजावर अन्याय करणारा नसेल असे प्रयत्न केले जातील असे यावेळी बोलताना स्पष्ट केले. तसेच उपोषणकर्त्या आंदोलकांशी दुरध्वनीवरुन संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधला तसेच त्यांची विचारपूसही केली.

धनगर समाजाची अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा यासाठी कायद्याच्या विहीत पद्धतीचा अवलंब करावा लागेल. त्यासाठी सचिव स्तरावर तातडीने पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न केले जातील. यात राज्याचे महाधिवक्ता, विधी व न्याय विभाग यांचा सल्ला घेतला जाईल. आदिवासी विकास विभागासह संबंधित अन्य विभागांचे सचिव तसेच समन्वय समितीच्या सदस्यांचा सक्रिय सहभाग घेऊन अन्य मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही केली जाईल असेही याप्रसंगी स्पष्ट केले.

🤙 9921334545