वेतवडे येथील युवा नेतृत्व संदीप पाटील स्वगृही परतले ; माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वात शिवसेनेत जाहीर प्रवेश

कोल्हापूर : माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली, करवीर विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरूच आहेत. कार्यकर्ते नरके यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आज वेतवडे येथील युवा नेतृत्व संदीप पाटील हे स्वगृही परतले आहेत. या पूर्वी ते मा.आ.चंद्रदीप नरके यांच्या गटात होते, पण गेल्या पाच वर्षात काही कारणास्तव त्यांनी काँग्रेसची वाट पकडली होती. पण त्या ठिकाणच्या कार्यप्रणालीवर नाराज असणाऱ्या संदीप पाटील यांनी काँग्रेस गटातून माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वात, आपल्या सहकाऱ्यांसोबत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

संदीप पाटील स्वगृही परतले याचा मला आनंदच आहे. यापुढे त्यांना कुठल्या कामात अडचण असेल तिथे मी उभा असेन असे, चंद्रदीप नरके यांनी सांगितले. तर, गेल्या पाच वर्षात करवीचा विकास खुंटला असून, त्याला उभारी द्यायची असेल तर चंद्रदीप नरके यांच्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे  सदैव त्यांच्या सोबत राहू आणि चंद्रदीप नरके यांचा बुलंद आवाज विधानसभेत गरजत राहावा यासाठी प्रचंड राबू, असे संदीप पाटील यांनी सांगितले.

नरके यांनी शिवसेनेचा मफलर आणि पुष्कगुच्छ देऊन संदीप यांचे स्वागत केले. यावेळी संग्राम पाटील, आशिष सोनार, पृथ्वीराज पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते.