मुंबई: गणेश उत्सवाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. येत्या मंगळवारी म्हणजे 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. अनंत चतुर्दशी दिवशी अकरा दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन होणार आहे. त्यासोबत सोमवारी ईद-ए-मिलाद सण आहे. त्यामुळे सोमवारी शासकीय सुट्टी आहे ,परंतु मंगळवारी अनंत चतुर्दशी असल्याने ती सुट्टी 18 सप्टेंबरला देण्यात आली आहे.
ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण आहे. यावेळी जुलूस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत. दरम्यान 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे त्यामुळे दोन्ही समाजामध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या उद्देशानेच ईद-ए-मिलाद ची सुट्टी बुधवारी देण्यात आली आहे.
मुंबई शहर तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी 18 सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी ,असा निर्णय घ्यावा असा प्रशासन विभागाला कळवल आहे. त्यामुळे आता ईद-ए-मिलाद ची सुट्टी बुधवारी मिळणार आहे