कोल्हापूर: चक्रेश्वरवाडी (ता.राधानगरी) येथील चक्रेश्वर तीर्थक्षेत्र देवालयास ‘ब’ वर्ग यात्रास्थळ योजनेतून दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. छत्रपती मालोजीराजे यांच्या हस्ते चक्रेश्वरवाडी ग्रामस्थांना निधीचे पत्र सुपूर्त करण्यात आले.
चक्रेश्वरवाडी येथे प्राचीन शिवमंदिर आहे. या निधीमुळे विविध सुविधा येथे उपलब्ध होतील . भाविकांसाठी निवास व्यवस्था तसेच अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे यांनी सांगितलं. निधीसाठी खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, मालोजीराजे यांचे सहकार्य लाभले . चक्रेश्वर वाडी ग्रामस्थांना मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते निधीचे पत्र सुपूर्त करण्यात आले यावेळी सरपंच सदाशिव भांदिगरे ,माजी सरपंच सात्ताप्पा नरके, आंनदा कुसाळे ,शंकर नरके आदि उपस्थित होते.