कोल्हापूर : धामोड पैकी कुरणेवाडी (ता.राधानगरी) येथे मृतदेहावर उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. स्मशानभूमीसाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु स्मशानभूमीचे काम रेंगाळलेले आहे . यामुळे पावसाळ्यात मृतदेहाची विटंबना होत असून, ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कुरणेवाडी हे 1000 लोक वस्तीचं गाव आहे. शासनाने येथे स्मशानभूमीसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र जागेच्या अभावी हे काम अपूर्ण राहिले आहे. स्मशानभूमी अभावी मृतदेहावर अंत्यविधी करताना गैरसोयीचे होते. पावसाळ्यात तर मृतदेहाची विटंबना होते. चिखलातून पायपीट करत अंत्यसंस्कार कराव लागत आहे. लवकरात लवकर याबाबत प्रशासनाने निर्णय घेऊन स्मशानभूमी बांधून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.