जिल्ह्यातील 23 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 4 हजार 356 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.27 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्र. 5 व 6 खुले असून सध्या धरणातून 4 हजार 356 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

 

 

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, वेदगंगा नदीवरील- शेणगाव, ताम्रपर्णी नदीवरील -चंदगड, भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे, खडक कोगे व सरकारी कोगे, दुधगंगा नदीवरील -दत्तवाड, सिध्दनेर्ली व बाचणी, वारणा नदीवरील – चिंचोली व माणगाव, हिरण्यकेशी नदीवरील- ऐनापूर व साळगाव, कासारी नदीवरील – यवलूज व ठाणे आळवे असे एकूण 23 बंधारे पाण्याखाली आहेत.

आज सकाळी 7 च्या अहवालानुसार बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 23 फूट, सुर्वे 22.5 फूट, रुई 52 फूट, इचलकरंजी 50.6 फूट, तेरवाड 46.6 फूट, शिरोळ 38.9 फूट, नृसिंहवाडी 38 फूट, राजापूर 26.11 फूट तर नजीकच्या सांगली 13.3 फूट व अंकली 17.4 फूट अशी आहे.