कणेरी मठासह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तीर्थस्थळासाठी 35 कोटी रुपयांचा निधी मंजूर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी येथील सिद्धगिरी मठासह विविध तीर्थस्थळासाठी सुमारे 35 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी राज्य सरकारच्या ब वर्ग तीर्थस्थळ विकास योजनेअंतर्गत दिला आहे. या अंतर्गत विविध प्रकारची कामे करण्यात येणार असून, यामुळे पर्यटनाला गती मिळणार आहे.  अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

 

 

कणेरी येथील सिद्धगिरी मठाला तीन कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीच्या माध्यमातून मंदिरासमोरील सभामंडप , स्त्री व पुरुष भक्ती निवास, यात्री निवास, भक्तनिवास, विद्युतीकरण ,परिसर सुधारणा ,पालखी मार्ग ,संरक्षण भिंती, रस्ते, स्वच्छतागृह आदी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत .

🤙 8080365706