बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू ;

नाशिक : गोंदिया तालुक्यातील एका शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ला केला यामध्ये त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रफुल्ल तांबे असं या मुलाचं नाव असून रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान लघुशंका करून तो घरात जाण्यासाठी निघाला असता, शेजारीच असणाऱ्या मक्याच्या शेतातून आलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घालून हल्ला केला.व त्यास ओढून नेले हे दृश्य त्याच्या वडिलांनी रवींद्र तांबे यांनी पाहिले.

 

 

त्यांनी आरडाओरडा करत शेजारी नागरिकांना आवाज देऊन जाग केलं. शेजाराने लाठीकाठी व बॅटरी घेऊन त्याचा शोध घेतला पंधरा मिनिटांनी मक्याच्या शेतात घरापासून तीनशे मीटर अंतरावर प्रफुल्ल जखमी अवस्थेत आढळून आला त्यास उपचारासाठी सिन्नर येथे नेला मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

या परिसरात गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा वावर असल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले असून सदर मुलावर सुद्धा बिबट्याने हल्ला केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

 

 

🤙 9921334545