पीएम विश्वकर्मा योजने अंतर्गत प्रशिक्षण लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप-आमदार राजु बाबा आवळे

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे

मिशन रोजगार अंतर्गत घेण्यात येणाऱ्या पीएम विश्वकर्मा योजने अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना आज डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग साळुंखे नगर कॅम्पस येथे प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

 

या कार्यक्रमाला उपस्थित राहून आमदार राजु बाबा आवळे यांचे हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. तसेच प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मिशन रोजगारचे समन्वयक राजन डांगरे यांनी मिशन रोजगार मा. आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मा. आमदार श्री ऋतुराज पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन नोकरी व व्यवसायाची संधी उपलब्ध करून देते याबाबतची माहिती दिली.

यावेळी विश्वकर्मा योजनेच्या जिल्हा समन्वयक शितल गणेश आचार्य, माजी उपनगराध्यक्ष हुपरी श्री गणेश वांईगडे, कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राठोड साहेब, नाभिक समाजाचे अध्यक्ष सयाजी झुंजार साहेब, दैवज्ञ शिक्षण समाज कोल्हापूरचे अध्यक्ष विजय घारे, पांचाळ सोनार संघाचे अध्यक्ष शितल पोतदार, कोल्हापूर सुवर्णकार संघटना अध्यक्ष नंदकुमार बेलवलकर आदी उपस्थित होते.

🤙 9921334545