मुंबई : 29 सप्टेंबर पासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणार आहेत. विधानसभेमध्ये भाजपचे सगळे आमदार पाडणार असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. अंतरवाली सराटी मध्ये ते बोलत होते.
“माझ्या नादाला लागू नका, मी तुमचा शत्रू नाही जर मला तुरुंगात टाकलं तर नागपुरची जागाही येणार नाही.एवढं लक्षात ठेवा.” असा इशारा मनोज जरांगे पाटील, यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
29 सप्टेंबरला मी उपोषणाला बसणार आहे. आणि ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. असे आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केले आहे. भाजपचे सर्व आमदार पाडू असा निर्धार मनोज जरांगे यांनी केला आहे.