पतीच्या छळाला कंटाळून, डॉक्टर महिलेने केली आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: येथील एका डॉक्टर महिलेने पतीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव प्रतीक्षा प्रीतम गवारे असे असून ही महिला डॉक्टर आहे. आत्महत्या करण्यापूर्वी प्रतीक्षाने चिठ्ठी मध्ये नवऱ्याने कशाप्रकारे  मानसिक त्रास दिला याबद्दल लिहिले आहे.

पती आपल्या चारित्र्यावर संशय कसा घेत होता तसेच हुंडा आणि फर्निचर साठी तगादा लावत होता, या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे, असं प्रतीक्षाने चिठ्ठीत लिहून ठेवलं होतं. प्रतीक्षा च्या वडिलांच्या फिर्यादीवरून पतीविरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनंतर आरोपी फरार झाल्याचे असल्याचे सांगितले आहे.

🤙 8080365706