मुंबई: अभिनेता शशांक केतकर हा नेहमीच मुंबईतील रस्ते ,स्वच्छता या मुद्द्यावर कायम व्यक्त होत असतो. त्याच्या तक्रारीनंतर बीएएमसी ने कारवाई देखील केली आहे.

शशांक केतकर ने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर मीरा भाईंदरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली दुरावस्था आणि रस्त्याची झालेली दुरावस्था याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. हे फोटो पोस्ट करत तो म्हणाला की, आपल्या देशात जे काय निर्लज्ज राजकारण होत आलं आहे. आत्ताही चालू आहे त्यांच्यावर खूप दबाव आहे मला मान्य आहे, पण तो दबाव ते पेलू शकतील म्हणून तर त्या हुद्द्यावरती मोठी मंडळी बसली आहेत. हा प्रश्न फक्त महाराष्ट्रातल्या एका चौकातला किंवा रस्त्यावरचा नाही तर प्रत्येक गावातला शहरातला देशातील प्रत्येक रस्त्यावरचा हा प्रश्न आहे
