कोल्हापूर प्रतिनिधी : युवराज राऊत
कोल्हापूरकरांना प्रथमच पुण्याच्या सुप्रसिद्ध अशा श्रीमंत दगडूशेठ हलवाई या गणेश मूर्तीच्या दर्शनाची संधी मिळणार आहे.श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती आता कोल्हापुरात ‘श्रीमंत जय गणेश मित्र मंडळ, शास्त्रीनगर प्रतिष्ठापित करणार असल्याची माहिती, मंडळाचे अध्यक्ष प्रथमेश पोलादी, उपाध्यक्ष साईराज दुधाने यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी या गणपती बाप्पाचे दर्शन रोज भाविकांना कसे करता येईल याही प्रयत्नात आहे असे सांगितले.
या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही गणेश मूर्ती पूर्णतः पर्यावरण पूरक असून फायबरमध्ये बनवण्यात आलीये.पुण्याचे सुप्रसिद्ध मूर्तिकार नानासाहेब इंदारी यांनी ही मूर्ती घडवलीये.
याविषयी अधिक माहिती देताना मंडळाचे उपाध्यक्ष साईराज दुधाने म्हणाले,
या पर्यावरण पुरक मुर्तीमुळे आमच्या मंडळाला नवीन ओळख मिळाली आहे. पुण्याचे मूर्तिकार नानासाहेब इंदारी यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीची पर्यावरण पूरक मूर्ती घडवली आहे.बाप्पाची ही मूर्ती साडेपाच फूट असून,पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिकृती असेल.5 सप्टेंबरला या मूर्तीची प्रतिष्ठापना आहे आणि सर्वांनी दर्शनासाठी उपस्थित राहावे . अशी विनंती त्यांनी केली.
यावेळी या पत्रकार परिषदेस ओंकार तावडे, सतीश होनकळसे, सुशील माने, राकेश चव्हाण, ओंकार होनकळसे, विक्रम पाटील, वरूण चौगुले, सनीत वायगकर ,सहर्ष होनकळसे, हर्ष दुधाने ,शैलेश आळवे आदी उपस्थित होते.