येत्या काही दिवसांत कोल्हापुरात राजकीय भूकंप : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर प्रतिनिधी: संग्राम पाटील

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना एकसंघपणे काम करत आहेत. राज्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या मतांची टक्केवारी वाढल्याचे दिसले. कोल्हापुरचा विचार करता राजघराण्याविषयी कोल्हापूरवासियांचे असलेले प्रेम हेच पराभवाचे प्रमुख कारण ठरले आहे. परंतु, पराभवाने खचून न जाता शिवसेना कोल्हापूर जिल्ह्यात एकसंघपणे काम करत आहे.

 

शिवसेनेचे खासदार, माजी खासदार, विद्यमान आमदार, माजी आमदार, तिन्ही जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख सर्वजण एकजुटीने काम करत आहोत. त्यामुळे शिवसेनेमध्ये सामील होण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. येत्या काही दिवसांत कोल्हापुरात राजकीय भूकंप होणार असून, जिल्ह्यातील मोठे नेते आगामी काळात शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतील. आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातून शिवसेनेचे सहा आमदार निवडून आणणार, असा विश्वासही राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

🤙 9921334545