मुंबई :वणी येथील मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी मतदारसंघासाठी आगामी विधानसभेचा मनसेचा उमेदवार जाहीर केला. मनसेकडून राजू उंबरकर यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकांचं तिकीट जाहीर करण्यात आलं आहे.
दरम्यान, येथील भाषणात राज ठाकरेंनी बदलापूरच्या घटनेचा उल्लेख करत, मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हा विषय बाहेर काढला, तेव्हाच पीडितेच्या न्यायासाठी सर्वजण पुढे आल्याचं म्हटलं. तसेच, आज छत्रपती शिवाजी महाराज असायला हवे होते, त्यांच्या काळात महिला अत्याचारांवरील घटनांना ज्यप्रमाणे शिक्षा व्हायची, तशीच शिक्षा आजही महिला अत्याचारांतील आरोपींना द्यायला हवी, असे राज ठाकरेंनी म्हटले. तसेच, एकवेळ माझ्याहाती सत्ता द्या, असे आवाहनही राज यांनी येथील मेळाव्यात केले.