दिल्ली: बांगलादेशात हिसाचार वाढत आहे . बांगलादेशातील हि परिस्थिती पूर्ववत व्हावी, अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट दिवशी लाल किल्ल्यावर व्यक्त केली होती.
त्यानंतर, बांगलादेशाचे अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांचा दूरध्वनी पंतप्रधान नरेंद मोदी यांना आला. “बांगलादेशातील हिंदू आणि सर्व अल्पसंख्याकांचे संरक्षण आणि सुरक्षेचे आश्वासन त्यांनी दिले”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित केली आहे. मोदींनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली.