मुंबई :अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला त्यानंतर लोकसभेची निवडणूक पार पडली .या निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा थेट सामना होता. पवारांच्या घरातील एक मुलगी आणि एक सून एकमेकांच्या विरोधात उभ्या राहिल्या, या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे निवडून आल्या तर सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला.

आता लोकसभेचा निकाल लागून दोन महिने झाले आहेत. त्यानंतर अजित पवारांनी एक कबुली दिली आहे, सुनेत्राला सुप्रिया विरोधात उमेदवारी द्यायला नको होती ही चूक अजित पवारांनी मान्य केली आहे.
