कोल्हापूर प्रतिनिधी: युवराज राऊत
कोल्हापुरमध्ये रस्त्यांची दुरावस्था झाली आहे ,रस्त्यातील खड्यामुळे येणाऱ्या, जाणाऱ्या लोकांना त्रास होतो .खराब रस्त्यांमुळे अपघाताचे प्रमाण ही वाढले आहे. रस्त्याच्या दुरावस्थेकडे महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पद्माराचे संघटनेच्या महिलांनी अभिनव आंदोलन केले.

यावेळी पद्माराचे संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासणे म्हणाल्या कि , कोल्हापुरात सगळीकडे सध्या रस्त्यांची परिस्थिती खूपच दयनीय झाली आहे ,सगळीकडे रस्त्यात खड्ड्याचे प्रमाण वाढले आहे ,त्यामुळे कोल्हापुरातील नागरिक तसेच बाहेरून येणारे प्रवासी यांना खूप त्रास सहन करावा लागतो .तसेच अपघातांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. . महानगरपालिका शंभर कोटी मंजूर होऊन पण रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे. तरी ते रस्ते लवकर व्हावेत अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली . यावेळी संघटनेच्या महिलांनी अध्यक्षा सरिता सासणे यांचा वाढदिवस रस्त्यात बसून साजरा केला.तसेच जीव धोक्यात घालून रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या लोकांना गुलाब वाटप करण्यात आले .
यावेळी ‘कोल्हापूर खड्डेमुक्त झालेच पाहिजे,’ ‘कोल्हापूर नव्हे खड्डेपूर’, ‘महानगरपालिका प्रशासनाचा धिक्कार असो’, अशा घोषणा देण्यात आल्या.
