अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर कारवाई

कोल्हापूर प्रतिनिधी : संग्राम पाटील

   कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय कोल्हापूर शहर यांच्या पथकाने शहरातील शाहूपुरी कुंभारगल्ली, जयंतीनाला परिसरात छापा टाकून राजू कनवाडे यांचे अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर कारवाई केली. यावेळी घटनास्थळावर  अंदाजे 49000/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

 

सदर अवैध गैस रिफीलिंग स्टेशन हे राजू कनवाडे ही व्यक्ती चालवत होती, त्याच्यावर शाहूपुरी पोलीस स्टेशनमधे गुन्हा दाखल केला आहे. या पथकामध्ये पथक प्रमुख नितीन धापसे पाटील (अन्नधान्य वितरण अधिकारी , कोल्हापूर शहर )यांचेसह पुरवठा निरीक्षक मुकुंद लिंगम व पुरवठा निरीक्षक अक्षय ठोंबरे यांचा समावेश होता. सदर कारवाईची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना दिल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले तसेच यापुढेही अशीच कारवाई करत राहण्याच्या सूचना दिल्या. सदर वस्ती दाटीवाटीची असल्याने अवैध गॅस रिफिलिंग करताना काही दुर्घटना घडल्यास मोठ्या प्रमाणावर जीवित वित्तहानी होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते त्यामुळे शहरातील अशा अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनची माहिती नागरिकांनी जवळच्या पोलीस स्टेशन किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयात कळवावी असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले. शहर अन्नधान्य वितरण अधिकारी नितीन धापसे पाटील यांनी पदभार स्वीकारलेपासून गेल्या 4 महीन्यात 7 ठिकाणच्या अवैध गैस रिफीलिंग स्टेशनवर कारवाया करुन संबंधीतांवर गुन्हे दाखल केले तसेच लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहर अन्नधान्य वितरण कार्यालयाने गेल्या चार महिन्यांत 4500 पेक्षा जास्त ई- शिधापत्रिका वितरण, प्राधान्य कुटुंब लाभ, अंत्योदय लाभ, महात्मा फुले जनआरोग्य योजनेकरीता वैद्यकीय लाभ प्रकरणे, युनीट वाढ/ युनीट कमी करणे इ. कामकाज अपूरे मनुष्यबळ असतानाही पार पाडले आहे. शहरातील सर्व रेशन दुकानदारांच्या वेळोवेळी बैठका घेवून शहरातील अन्नधान्य वितरण वेळेत होईल याची दक्षता घेतली आहे.

🤙 8080365706