कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्यानंतर कोल्हापूरमध्ये अस्वस्थता निर्माण झाली, नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी अनेकांनी मदतीची तयारी दर्शवली आहे.

आगीमुळे कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची भीती कोल्हापूर प्रशासनाला वाटत आहे, यातूनच नाट्यगृहाच्या 100 मीटर अंतरात सामान्य लोकांना येण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे, करवीर प्रांत अधिकारी यांनी तसा आदेश काढला आहे.
