कोल्हापूर शहरातील कोचिंग क्लासेस,स्टडी सेंटर इमारतीची तपासणी व्हावी: कृती समितीकडून महापालिकेकडे मागणी

कोल्हापूर :  कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालेली नाही, परंतु लोकसंख्या वाढली, विद्यार्थी संख्या वाढली त्यामुळे कोचिंग क्लासेसची संख्या वाढली .इमारतीत जागेचा तुटवडा जाणवत आहे ,नियमावलीचा भंग करुन कोचिंग क्लासेस सुरू आहे .शिक्षण देण्याच्या नावाखाली कमी जागेत जास्त विद्यार्थी बसवले जात आहेत, या सर्व बाबी विद्यार्थी जीवाशी खेळणार आहेत आणि स्पर्धात्मक युगामध्ये आपला पाल्य शैक्षणिक स्पर्धेत अव्वल ठरावा म्हणून पालक या सर्व बाबीकडे दुर्लक्ष करीत आहेत.

याबाबत कृती समितीचे adv. बाबा इंदुलकर म्हणाले की , हा विषय विद्यार्थ्यांच्या जीवाशी निगडित असल्याने येणाऱ्या पंधरा दिवसात कोल्हापूर शहरातील सर्व गल्ली बोळातील इमारती यांच्या तपासण्या होऊन अशा प्रकारचे शिकवणी कोचिंग क्लास स्टडी सेंटर यांची एकूण संख्या यांची खात्री करून घ्यावी व नियमावलीचे पालन होते की नाही याची खातर जमा करावी तसे न झाल्यास विद्यार्थ्यांच्या जीवाची हित लक्षात घेऊन आंदोलन छेडावे लागेल .

यावेळी महानगरपालिकेचे अति. आयुक्त राहुल रोकडे ,उपायुक्त साधना पाटील, नेत्रदीप सरनोबत ,एन.एस .पाटील ,रमेश मस्कर ,राम काटकर ,रनभिसे व कृती समितेचे आर के पवार ,बाबा पार्टे ,संभाजी जगदाळे ,दिलीप पोवार आदी उपस्थित होते

 

 

 

 

🤙 8080365706