अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले पिकांची भरपाई मिळावी: भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर यांची पुनर्वसन खात्याकडे मागणी

    कोल्हापूर: चालू वर्षी जून ते जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात झालेले अतिवृष्टीमुळे व पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला.मोठ्या प्रमाणात झालेल्या नुसकानीचे पंचनामे करण्याच्या सूचना महसूल विभागाला देऊन सर्व पंचनामे करून घ्यावेत झालेल्या नुकसानीचे भरपाई मिळावी, यासाठी भाजप ग्रामीण  जिल्हाध्यक्ष  निंबाळकर यांचा पाठपुरावा सुरु आहे, याला अपेक्षित असे यश मिळण्याकरिता व भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हावी यासाठी निंबाळकर प्रयत्न करत आहेत.

निंबाळकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून महसूल विभागाला नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचना दिली आहे, नुकसान भरपाई मिळावी यासाठी पुनर्वसन खात्याकडे निंबाळकर यांचा पाठपुरावा सुरू आहे. यावेळी पुष्पाताई पाटील, अशोकराव माने, विठ्ठल पाटील उपस्थित होते..