कागल तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून श्रीमती अश्विनी अतुल कारंडे राहणार, लक्षदीप नगर, रेल्वे स्टेशन जवळ, न्यू शाहूपुरी कोल्हापूर. यांना 30000 रुपयाची लाज घेताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
कारंडे या काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातून कागल तहसील कार्यालय या ठिकाणी बदली होऊन गेल्या होत्या. त्यांनी एका तक्रारदाराकडे त्याच्या जमिनीच्या येणे बाबत साठ हजार रुपयाची लाचेची मागणी केली. यापैकी 30000 रुपयाची लाज घेताना आज सायंकाळी लाच लुचपत विभाग यांच्यावतीने त्यांना रंगेहात पकडण्यात आले. कागल पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या कारवाईमुळे नुकतंच निवडणुकीच्या कामातून पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या कामात रुजू झालेल्या महसूल विभागाच्या या महिला कर्मचाऱ्यांच्या कारणाम्याची चर्चा सर्वत्र सुरू झाले आहे. याबाबतचा अधिक तपास लाच लुचपत विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे करीत आहेत.